मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या विविध याचिकांवर सुनावणीला सुरुवात , मोर्चावरून इंडिया आघाडीलाही सुनावले...

Foto
नवी दिल्ली : निवडणूक आयोगाकडून राबवण्यात आलेली एसआयआर प्रक्रिया, तसेच मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या विविध याचिकांवर आज  सुनावणीला सुरुवात  झाली आहे.  या सुनावणीवेळी सरन्यायाधीश सूर्यकांत  यांनी राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयावर आणलेल्या मोर्चाबाबत परखड टिप्पणी केली आहे.

निवडणूक आयोगाकडून राबवण्यात आलेली एसआयआर प्रक्रिया, तसेच मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधत सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या विविध याचिकांवर आज  सुनावणीला सुरुवात  झाली आहे.  या सुनावणीवेळी सरन्यायाधीश सूर्यकांत  यांनी राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयावर आणलेल्या मोर्चाबाबत परखड टिप्पणी केली आहे. तसेच देशाची न्यायव्यवस्था ही एवढी कमकुवत नाही आहे, तसेच सर्वोच्च न्यायालयाला कुणीही घाबरवू किंवा धमकावू शकत नाही. हे निरर्थक प्रयत्न आहेत. कोर्ट अशा प्रयत्नांकडे लक्ष देत नाही, अशी टिप्पणी केली.

एसआयआर तसेच  मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयोगाविरोधात राहुल गांधी आणि इतरांनी दाखल झालेल्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणीला सुरुवात झाली. या सुनावणी वेळी वरिष्ठ वकील गौरव भाटिया यांनी १२ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात जे काही घडले ते अनाकलनीय होते, असं विधान केलं. त्यावेळी राहुल गांधींनी काढलेल्या मोर्चावर प्रतिक्रिया देताना सरन्यायाधीश म्हणाले की, कुणीही सर्वोच्च न्यायालयाला घाबरवण्याचा किंवा धमकावण्याचा प्रयत्न करू शकत नाही. हे व्यर्थ प्रयत्न आहेत, तसेच यावर कुणीही लक्ष देत नाही. तसेच सर्वोच्च  न्यायालयावर काढण्यात आलेला मोर्चा आणि त्यावेळी निर्माण झालेली अव्यवस्था याबाबत राहुल गांधी यांना स्पष्टीकरण द्यावे लागेल, असेही सरन्यायाधीशांना सांगितले आहे. 

यावेळी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात राजकीय मोर्चा काढण्याच्या कृत्यावरही तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले की, न्यायालयाच्या बाहेर काय बोललं जात आहे आणि न्यायालयाच्या आत काय सांगितलं जात आहे, याची आम्हाला जाणीव आहे.  आम्ही कुठल्याही काल्पनिक  जगात वावरत नाही आहोत. आम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती आहे. सर्वोच्च न्यायालयाला घाबरवण्याचा प्रयत्न कुणी करू शकत नाही. ही न्यायव्यवस्था घाबरवता येईल, एवढी कमकुवत नाही.